“वर देताना आम्हाला शरमल्यासारखे होते, शाप देताना असहाय वाटते. जे नियतीच्या इच्छेप्रमाणे घडणार आहे त्याच मर्यादेत आमचे शाप-वर असतात. त्या पलीकडे आम्ही दुबळेच असतो.”
- एका देवाचा मृत्यू
जी. ए. या महान कथाकारानं लिहून ठेवलेलं एक अजरामर सत्य…
काही वर मिळतात पण त्याचवेळी त्या वराला छेद देणारा एक शापही त्याचवेळी आपल्याला मिळालेला असतो.
त्यामुळे भूतकाळातील एक छोटासा प्रसंग अथवा घटनाही आपल्याला भावव्याकूळ करणारी ठरते. भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातला सांगड घालण्याचा हा छोटासा प्रयत्न…